
2005 मध्ये हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान अधिकार मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वडिलांच्या संपत्तीत मुलींना वाटा मिळणारच; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने वारसा संपत्तीच्या अधिकारा संदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, वडिलांचा मृत्यू हिंदू वारसा (सुधारीत) अधिनियम, 2005 लागू होण्याच्या आधी झाला असला तरीही मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे. हिंदू महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार मिळेल. वडिलांच्या सपत्तीमध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान अधिकार असतील असा कायदा तयार कऱण्यात आला आहे. मात्र यामध्ये वडिलांचा मृत्यू 2005 च्या आधी झाला असल्यास कायदा लागू होणार की नाही याचा उल्लेख स्पष्ट नाही.
न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयात वडिलांचा मृत्यू कायदा लागू होण्याआधी झाला असेल तर मुलीचा अधिकार आहे की नाही अशा एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश म्हणाले की, कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू होईल. मग त्यात वडिलांचा मृत्यू कायदा लागू होण्याआधी झाला असेल तरी मुलीला मुलाच्या बरोबरीनेच अधिकार मिळतील.
हे वाचा - लाल किल्ल्याभोवती कोरोना सुरक्षा कवच
2005 मध्ये हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान अधिकार मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. वर्ग 1 कायदेशीर वारस असल्यास मुलीचा मुलाएवढाच संपत्तीवर अधिकार आहे. लग्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही. मुलगी ही मुलगीच असते तर मुलगा हा तोपर्यंतच मुलगा असतो जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही असंही न्यायलायने नमूद केलं. मुली त्यांच्या अधिकारातील संपत्तीवर दावा करू शकतात.
कायद्यानुसार संपत्ती दोन प्रकारच्या
१) वडिलोपार्जित संपत्त किमान चार पिढ्यांपासून असेल. कायद्यानुसार मुलगी असो किंवा मुलगा या संपत्तीवर दोघांनाही अधिकार सांगता येतो. वडिलोपार्जित संपत्ती कोणत्याही एका अपत्याला देता येत नाही. वडिलांनासुद्धा एकाच्या मुलाच्या नावावर संपत्ती करता येत नाही. त्यामुळे मुलीला तिच्या अधिकारातील संपत्ती द्यावी लागेल.
हे वाचा - गांधी कुटुंबिय अन् सचिन पायलट यांच्यातील पडद्यामागची कहाणी
2) वडिलांनी खरेदी केलेल्या संपत्तीबाबत मात्र कायदा वेगळा आहे. वडिलांनी घर, प्लॉट किंवा संपत्ती खरेदी केली असेल तर यावर मुलीला अधिकार सांगता येत नाही. वडिल त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही ही संपत्ती देऊ शकतात. यावर मुलगी आक्षेप नोंदवू शकत नाही.
3) मृत्यूपत्र न लिहिता वडिलांचा मृत्यू झाला तर सर्व वारसांना संपत्तीचे समान वाटप होते. त्यामध्ये वडिलोपार्जित आणि वडिलांनी खरेदी केलेल्या संपत्तीचा समावेश असतो.