
Yogi Adityanath : मोठा निर्णय! खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार
Uttar Pradesh Government News : उत्तर प्रदेशातल्या खाजगी शाळांमध्ये मुलींसाठी योगी आदित्यनाथ सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची फीस सरकार भरणार आहे.
यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी सांगितलं होतं की, कुठल्या शाळेमध्ये दोन सख्ख्या बहिणी शिकत असतील तर एकीची फीस शालेय प्रशासनाने माफ करावी.जर शालेय प्रशासनाला फीस माफ करणं शक्य नसेल तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने एका बहिणीची फीस भरली जाईल.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
सूत्रांच्या माहितीनुसार जसजसं लाभार्थी वढतील तसं निधींमध्ये वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये याच योजनेची चर्चा आहे. मुलींच्या शिक्षणासाठी योगी सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे.
यूपी ग्लोबल इन्वेस्टर्स समिटनंतर विधानसभेमध्ये बजेट सादर होणार आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरु करण्यात आलेली आहे. यावेळी मुलींच्या शिक्षणासंदर्भातील प्रस्ताव मंजूर होईल, असं सांगितलं जात आहे.