Gujarat Fire Video : गुजरातमध्ये कार शोरुमला भीषण आग; आजुबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात

Gujarat Fire News
Gujarat Fire Newsesakal

सुरतः गुजरातमध्ये एका कार शोरुमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या ज्वाळांना आजूबाजूचा भागही भक्ष्यस्थानी घेतला आहे.

सुरतमधल्या उधना भागामध्ये ही घटना घडली आहे. एका कार शोरुमला अचानक आग लागली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कम सुरु आहे. 'एएनआय'ने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिलेली आहे. आगीचा व्हीडिओ धक्कादायक असून आगीने मोठा परिसरत कवेत घेतल्याचं दिसून येतंय.

सुरतमधल्या आगीचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली असून जीवितहानीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

Gujarat Fire News
Pune Crime : पार्ट टाईम जॉब अन् कमिशनच्या नादापायी महिलेला गंडवलं

या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com