पैशांसाठी भाजपमध्ये गेलो नाही- दयानंद सोपटे

पैशांसाठी भाजपमध्ये गेलो नाही- दयानंद सोपटे

पेडणे (गोवा)- काँग्रेसकडे बहुमत असूनही सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवाशप्पथ सांगतो या प्रवेशासाठी एक पैशाही घेतला नाही अशी भूमिका दयानंद सोपटे यांनी मांद्रेतील सभेत भावनावश होताना मांडली.

मांद्रे मतदारसंघाचा विकास, मंत्रीपद, मांद्रेमधून पोटनिवडणुकीवेळी भाजपची उमेदवारी व निवडणुकीसाठी सहकार्य तसेच लक्ष्मीकांत पार्सेकरांची समजूत पक्षाने काढण्याच्या या अटीवर हा प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असतानाही भाजप सरकारने मांद्रेमधील उमेदवारांना मी केलेल्या विनंतीनुसार नोकऱ्या दिल्या तसेच सुमारे 30 कोटींची कामे केली. त्यामुळे जर मांद्रेचा विकास व्हायचा असेल व उमेदवारांना रोजगार मिळवून द्यायचा असल्यास भाजप हाच पर्याय आपल्यासमोर होता व त्याचा निर्णय काही कारणास्तव कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घ्यावा लागला असे त्यांनी सभेत प्रांजळपणे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com