त्या रात्री विकास दुबेनं तासाभरात 50 हत्यारबंद गुंड आणले, अन्...

टीम ई-सकाळ
रविवार, 5 जुलै 2020

तो  स्वत: पोलिसांचा प्रतिकार करण्यासाठी गुंड आणण्यासाठी निघून गेला. जवळपास तासाभरात 50 गुंडासह तो घरी परतला. त्यांनीच पोलिसांवर हल्ला केला, अशी माहिती दयाशंकर अग्निहोत्रीने पोलिसांना दिली आहे.  

कानपूर: पोलिसांना घेराव करुन गोळ्या घालणाऱ्या विकास दुबेसोबत असलेल्या दयाशंकर अग्निहोत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान दयाशंकरने धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिस आपल्या घरावर धाड टाकणार असल्याची माहिती विकास दुबेला गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारासच मिळाली होती. हा फोन पोलिस ठाण्यातून आला असेही त्याने सांगितले आहे. त्यानंतर विकास दुबेने  खिडकी दरवाजे बंद करण्यास सांगितले. तो  स्वत: पोलिसांचा प्रतिकार करण्यासाठी गुंड आणण्यासाठी निघून गेला. जवळपास तासाभरात 50 गुंडासह तो घरी परतला. त्यांनीच पोलिसांवर हल्ला केला, अशी माहिती दयाशंकर अग्निहोत्रीने पोलिसांना दिली आहे.  

विकास दुबेनं तुरुंगात असताना जिंकली होती निवडणूक, आता पोलिसांवर केला मोठा हल्ला

पोलिसांचे पथक घरावर धाड टाकण्याची माहिती देण्यासाठी ज्याने कोणी फोन केला होता त्याला विकास दुबे नेमका काय म्हणाला याचाही खुलाचा दयाशंकरने केलाय. पोलिसांना येऊ देत ते जिवंत परतणार नाहीत, असे विकास दुबे म्हणाला होता. रविवारी सकाळी पोलिसांनी विकास दुबेच्यासोबत असलेल्या दयाशंकरला अटक केली आहे. दया शंकरच्या पायाला गोळी लागल्याचे समजते. पोलिस चौकशीदरम्यान दयाशंकरने आपल्या कुटुंबियांबद्दलची माहितीही दिली आहे. पत्नी रेखासह मुस्कान आणि मेहक या दोन मुली असल्याचे त्याने सांगितले. दयाशंकर अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याचे आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर विकास दुबेच्या कुटुंबियांनी त्याचा सांभाळ केला. त्याचा विवाह देखील करुन दिला. दयाशंकर पांडे दुबेच्या घरात स्वयंपाक आणि जनावरांना सांभाळण्याचे काम करायचा.

'राजकारणानं उद्धवस्त केलं, त्याला मारून टाका'; विकास दुबेच्या आईची भावना

ज्या दिवशी पोलिसांवर गोळीबार झाला त्यादिवशी रात्री साडे आठच्या दरम्यान विकास दुबेच्या मोबाईलवर कोणी तरी कॉल केला होता.  उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गोळीबार झाला होता. यात एका अधिकाऱ्यासह 8 जण हुतात्मा झाले. या प्रकरणात बेजबाबदार धरुन चौबेपूर पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  चौबेपूरचे पोलिस ठाण्याचे इनचार्ज विनय तिवारी यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांना पुढे जाण्यास सांगून स्वत: मागे राहिले होते. त्यांच्या कॉल डिटेल्सही मागवल्या असून या प्रकरणात त्यांची भूमिका काय यासंदर्भातील तपासही सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dayashankar Agnihotri Revealed 50 miscreants opened fire on the police from Vikas Dubey house in kanpur