esakal | भारतात कोरोनावर हेटेरोच्या औषध वापराला DCGIकडून मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात कोरोनावर हेटेरोच्या औषध वापराला DCGIकडून मंजुरी

कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

भारतात कोरोनावर हेटेरोच्या औषध वापराला DCGIकडून मंजुरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला असून सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जात आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लोकांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी सातत्यानं कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केंद्राकडून केले जात आहे. कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याचा वापर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तींवर उपचारासाठी केला जाईल. औषध निर्मिती करणारी कंपनी हेटेरो ड्रग्जसने याबाबतची माहिती सोमवारी दिली.

हेटेरो ड्रग्जने म्हटलं की, कोरोनाच्या उपचारात हे औषध महत्त्वाची भूमिका बजावू शकते. रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या लोकांना कॉर्टिकोस्टेरॉइड या ऑक्सिजनची किंवा एक्स्ट्रा कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनची गरज आहे अशा रुग्णांना हे औषध दिलं जाईल. कोरोनाचा धोका कमी करण्यामध्ये औषध प्रभावी ठऱत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: सरकारसोबत आम्हाला संघर्ष नकोय; केंद्राला SC ने फटकारले

हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर बी पार्थ सारधी रेड्डी यांनी औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्यानंतर यामुळे कोरोना रुग्णांना फायदा होईल अशी आशा व्यक्त केली आहे. औषधाच्या वितरणासाठी आम्ही सरकारसोबत मिळून एक प्लॅन तयार करू असं त्यांनी सांगितलं. जगातील वेगवेगळ्या भागात या औषधाचा तुटवडा भासत असल्याचं त्यांनी म्हटलं. हैदराबादमधील जडरेचला इथल्या हेटेरोच्या बायोलॉजिक्सचे युनिट हेटेरो बायोफार्मामध्ये याची निर्मिती होणार आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत औषध उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top