esakal | लसींच्या मिश्रणावर चाचण्या सुरू; DCGIने दिली CMCला परवनगी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

लसींच्या मिश्रणावर चाचण्या सुरू; DCGIने दिली CMCला परवनगी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चेन्नई: कोरोनाच्या लसींचं एकत्रीकरण करुन चाचण्या घेण्यास वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला (CMC) डीसीजीआयने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. याबाबत भारत सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरुप यांनी माहिती देताना म्हटलंय की, सीएमसी वेल्लोरला डीसीजीआयने लसींच्या एकत्रीकरणाची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा: SpaceX: चौघांसह अंतराळात होतंय उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही

याप्रकारचे इतर काही एकदोन अभ्यास सुरु झाले आहेत. मात्र, अधिक खात्रीसाठी आम्हाला अधिक सायंटिफीक डेटा हवा आहे. हैदराबादमधील Biological E च्या कोविड -19 लसीबद्दल बोलताना, डॉ. स्वरूप यांनी म्हटलंय की, त्यांची चाचणी अत्यंत प्रगत अवस्थेत आहे. समांतरपणे, त्यांचे लस उत्पादन देखील चालू आहे.

लस कधी उपलब्ध होईल, याबाबतच्या संभाव्य तारखेबद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "लस प्रत्यक्षात कधी बाहेर पडेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. आम्हाला विश्वास आहे की ती उत्तम ठरेल कारण आतापर्यंतचे निष्कर्ष खूपच चांगले आहेत."

हेही वाचा: मोठी बातमी! सहा दहशतवादी अटकेत; देशभरात करणार होते घातपात

मिळालेल्या माहितीनुसार, Biological E त्यांची कोरोनाव्हायरस लस - कॉर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पहिला आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी डेटा सादर करण्याची शक्यता आहे.

loading image
go to top