esakal | SpaceX: चौघांसह अंतराळात होतंय उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही
sakal

बोलून बातमी शोधा

SpaceX: चौघांसह अंतराळात होतंय उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही

SpaceX: चौघांसह अंतराळात होतंय उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन : अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोचविणे, तेथून पृथ्वीवर यानाद्वारे सुखरूप आणण्यात यशस्वी ठरलेली एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी बुधवारी (ता.१५) नवा इतिहास रचणार आहे. कंपनीतर्फे उद्या अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. ‘इन्स्पिरेशन -४’ या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून चार जणांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळणार आहे. फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यान चौघांना घेऊन अवकाशात भरारी मारेल. उड्डाणाची वेळ कंपनीने निश्‍चित केलेली नाही. हवामानाचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

मोहिमेविषयी...

 • - मोहिमेला ‘इन्स्पिरेशन -४’ असे नाव

 • - अब्जाधीश जेअर्ड इसॅकमॅन (वय ३८) हे सर्व खर्च करणार

 • - इसॅकमॅन यांनी स्वतःचा पैसा पुरविला आहे. तसेच देणगीही गोळा केली

 • - अमेरिकेतील टेनसीमधील सेंट चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट

 • - मोहिमेतून २० कोटी डॉलर एवढा निधी जमविण्याचे इसॅकमॅन याचे स्वप्न

 • - यातील निम्मी रक्कम ते रुग्णालयाला देणार

 • - लोकांना प्रेरित करणे व कर्करोगाबद्दल जागृती करणे हाही एक हेतू

 • - मोहिमेतील सदस्य यापूर्वी कधीही अंतराळात गेलेले नाहीत

 • - प्रत्येक सदस्यांचे मूल्य निश्‍चित केले आहे. उदा. लिडरशीप, होप, इन्स्पिरेशन आणि प्रॉस्पेरिटी

हेही वाचा: Video: पुराच्या पाण्यातही 'बोलेरो'ची दमदार सवारी; आनंद महिंद्राही झाले चकीत!

सहभागी सदस्यांचा परिचय

 • जेअर्ड इसॅकमॅन : मोहिमेचे नेतृत्व इसॅकमॅन यांच्या हातात. इ-कॉमर्स कंपनी ‘शिफ्ट४ पेमेंट्स’चे ते संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या १६व्या वर्षीच त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. आज ते अब्जाधीशांमध्ये गणले जातात. ते व्यावसायिक वैमानिक असून स्वतःच्या विमान प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अमेरिकी हवाई दलातील वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते.

 • हेली अर्केनो : पृथ्वीभोवताच्या कक्षेत पाठविली जाणारी व अवकाशात कृत्रिम अवयव घेऊन जाणारी हेली अर्केनो ( वय २९) ही पहिली युवा अमेरिकन ठरणार आहे. तिच्या आसनाला ‘होप’ हे मूल्य दिले. मोहिमेत ती वैद्यकीय व्यवस्थापकाच्या भूमिकेत असेल.

 • शॉन प्रॉक्टर : या मोहिमेसाठी इसॅकमॅन कंपनीने आयोजित केलेली ऑनलाइन विक्रीत जिंकली होती. तिच्या आसनाला ‘प्रॉस्पेरिटी’ असे नाव आहे. प्रॉक्टर (वय ५१) या एका महाविद्यालयात भूगर्भशास्त्र हा विषय शिकवितात. ‘नासा’च्या अनेक अवकाश मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे.

 • ख्रिस सेम्ब्रोस्क : सेम्ब्रोक (वय ४२) हे अमेरिकेचा हवाई दलात वैमानिक होते. इराकविरुद्धच्या युद्धात ते सहभागी झाले होते. सध्या सेम्ब्रोक ‘लॉकहिड मार्टिन’बरोबर काम करतात.

‘ब्लू ओरिजिन’ आणि ‘व्हर्जिन स्पेसशिप’ची तुलना

 • - पृथ्वीच्या कक्षेत जाणारी ‘इन्स्पिरेशन -४’ ही पहिली बिगर व्यावसायिक अंतराळवीरांची मोहीम आहे

 • - यापूर्वी ‘ब्लू ओरिजिन’ आणि ‘व्हर्जिन स्पेसशिप’ या दोन कंपन्यांनी खासगी अवकाश मोहिमेला प्रारंभ केला आहे. मात्र त्यांनी अवकाशाच्‍या सीमेपर्यंतच उड्डाण केले होते

 • - इन्स्पिरेशन -४’ हे पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरणार आहे

 • - आधीच्या दोन्ही अंतराळयानांपेक्षा हे यान सुमारे ४७५ किलोमीटरपेक्षा उंची गाठणार आहे.

 • - ‘ब्लू ओरिजिन’ आणि ‘व्हर्जिन स्पेसशिप’ यांची मोहीम काही मिनिटांचीच होती.

 • - ‘इन्स्पिरेशन -४’ मोहीम तीन दिवसांची आहे

 • - या यानात दोन प्रशिक्षित वैमानिक आहेत, पण यानाचे संचलन करण्यात त्यांचा कोणताही सहभाग नसेल

loading image
go to top