निर्भया हत्याकांडाला 10 वर्षे पूर्ण; महिला आयोगानं केंद्राकडं केली 'ही' मागणी I Nirbhaya Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Commission for Women Swati Maliwal

'निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत.'

Nirbhaya Case : निर्भया हत्याकांडाला 10 वर्षे पूर्ण; महिला आयोगानं केंद्राकडं केली 'ही' मागणी

10 Years Of Nirbhaya Case : आजच्या दिवशी म्हणजेच, 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. ही घटना 'निर्भया केस' म्हणून ओळखली जाते.

निर्भया सिनेमा पाहून झाल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय इतर सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्याला विरोध केल्यानं आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की, तो बेशुद्ध झाला. यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर तिच्यावर अत्याचारही केले. या 'निर्भया' प्रकरणाला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत.

हेही वाचा: संतापजनक! आठ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केला बलात्कार; 14 वर्षाच्या मुलाला अटक

याच पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना पत्र लिहून महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आजचं संसदेचं कामकाज पुढं ढकलण्याची विनंती केली.

हेही वाचा: Ashish Shelar : आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न; शेलारांची राऊतांवर सडकून टीका

DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ट्विट केलं की, 'निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत काहीही बदललं नाही, हे खेदजनक आहे. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब करण्याची आणि महिला सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केलीय.'

टॅग्स :Nirbhaya CaseDelhi Police