esakal | सोडून दिलेल्या मृतदेहांमुळे गंगा मैली
sakal

बोलून बातमी शोधा

सोडून दिलेल्या मृतदेहांमुळे गंगा मैली

सोडून दिलेल्या मृतदेहांमुळे गंगा मैली

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा: उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमधून वाहणाऱ्या गंगा नदीतही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले आहेत. यामुळे गंगेतून जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूचा विचार केला तर त्याचा संसर्ग नदीच्या पाण्यातून होण्याची शक्यता बिलकूल नाही. पण जर नदीत सोडलेले मृतदेह किनाऱ्यावर साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आले तर तेथून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. (Dead Bodies in Ganga River can be spreader of coronavirus)

हेही वाचा: भारताची लसीकरण मोहीम अपयशी ठरलीय? वाचा काय आहेत नेमकी कारणं

गंगेतील मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याचा सांगण्यात येत असून असे मृतदेह नदीत सोडण्यावरील बंदीचे सक्तीने पालन न केल्यास गंगेतून जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये गंगेत आढळलेले मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहत आल्याचा दावा राज्य सरकारने करीत आहे. मात्र संशोधकांच्या मते मृतदेहांमुळे नदीचे प्रदूषण आणि अन्य आजाराचे भय आहेच. नदीत मृतदेहांचे पूर्णपणे विघटन होणे अवघड असते. अशा वेळी मृतदेहाच्या संक्रमित शरीराच्या माध्यमातून जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरण्याचे धोका आहे. नदीतील जलचरांना कोरोना होण्याची शक्यताही नगण्य आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'ट्विटर'च्या खास सेवांसाठी आता मोजावे लागणार पैसे

नदीतील मृतदेह हे काही प्रकारचे मासे व कासव खातात. या मृतदेहावर वाढलेले जिवाणू आणि बुरशी त्यांच्या पोटात जाते. मासे हे मानवाचे खाद्य असल्याने त्यामाध्यमातून नुकसानकारक घटक खाण्यात आल्यास अनेक आजारांना ते निमंत्रण ठरू शकते.

संशोधकांचा इशारा

  • गंगेत मृतदेह सोडण्याचा प्रकार दीर्घकाळ सुरू राहिल्यास नदीच्या पर्यावरणावर घातक परिणाम

  • पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटेल

  • जीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होईल

  • जलचरांवर परिणाम नाही

  • मानवाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

हेही वाचा: दररोज गोमूत्र पिते, म्हणून कोरोना झाला नाही- साध्वी प्रज्ञा

नदीत सोडलेल्या मृतदेहांवर जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जीवाणू आणि बुरशीजन्य आजारांचा सर्वांत जास्त धोका आहे. अशा पाणी पिण्‍यासाठी, अंघोळीसाठी वापरले तर अनेक प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

- प्रा. आर. के. सिन्हा, जलचर संशोधक

------------------------------------

कोरोनाव्हायरसची लागण झालेला मृतदेह किनाऱ्याला लागलेला असेल, तर तेथील पाण्याला स्पर्श करणेही घातक ठरू शकते. पण तेथे त्याच्या पोषणासाठी माध्यम नसल्याने हा विषाणू जास्त काळ टिकू शकत नाही.

- प्रा. वीरेंद्र प्रसाद, जैवतंत्रज्ञान विभाग, पाटणा विद्यापीठ