esakal | अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला मृतदेह; उडाली एकच खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

dead_body_

बिहारची राजधानी पाटणामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे

अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला मृतदेह; उडाली एकच खळबळ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहारची राजधानी पाटणामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्हालाही आश्चर्यचा धक्का बसेल. बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क मृतदेह पोहोचला होता, हे पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. कोणालाही ही घटना खोटी वाटेल पण हे सत्य आहे. 

बँकेत पोहोचला मृतदेह

घटना राजधानी पाटणाच्या शहाजहांपूर तालुक्यातील आहेत. येथील सिगरियावा गावातील कॅनरा बँकेत एकच गोंधळ उडाला, जेव्हा तिरडीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यास सांगण्यात आले. सिगरियावा गावात राहणाऱ्या 55 वर्षीय महेश यादव यांचा 5 जानेवारीला मृत्यू झाला होता. 

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलींनी दिली प्रतिक्रिया

महेश यांचं अंत्यसंस्कार करायचं होतं, पण त्यासाठी कोणाकडेही पैसे नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांना महेश यांचा मृतदेह बँकेत घेऊन जावा लागला आणि त्यांच्या खात्यातील पैसे काढण्याची मागणी करावी लागली. पण, बँक अधिकाऱ्यांनी असं करण्यास नकार दिला. 

कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर नियम-कायद्यांचा पेच निर्माण झाला. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी पैसे उपलब्ध नसल्याने थेट महेश यांचा मृतदेह घेऊन थेट बँके गाठली होती. या घटनेने पूर्ण बँकेत एकच खळबळ उडाली. सांगितलं जातंय की तब्बल तीन तास महेश यांचा मृतदेह बँकेत पडून होता. त्यानंतर बँकेच्या मॅनेजरने प्रकरण मिटवण्यासाठी आपल्या खिशातून 10 हजार रुपये दिले आणि गावकऱ्यांना समजावून अंत्यसंस्कारासाठी त्यांना पाठवलं. 

दाराशा, होटगी आरोग्य केंद्र, अकलूज ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाची...

वारस नसल्याने अशी घटना घडली

मृत महेश यादव यांचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे महेश यांनी जेव्हा बँकेत आपलं खातं उघडलं, तेव्हा त्यांनी कोणालाही वारस केलं नव्हतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये एक लाखांपेक्षा अधिक पैसे होते. बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महेश यांनी आपलं KYC ही अपडेट केलं नव्हतं. त्यामुळे मॅनेजरने पैसे देण्यास नकार दिला होता. 

loading image