
विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू झालेला मध्यान्ह भोजन विविध कारणांनी चर्चेत असतो. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका शाळेत शिजवण्यात आलेल्या खिचडीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
लखनौ (उत्तर प्रदेश): विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू झालेला मध्यान्ह भोजन विविध कारणांनी चर्चेत असतो. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका शाळेत शिजवण्यात आलेल्या खिचडीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मुस्तफाबाद भागातल्या जनता इंटर कॉलेज सरकारी शाळेत आज (मंगळवार) डाळ-भात असा मेनू ठरला होता. जन कल्याण सेवा समिती या हापूर मधील संस्थेतर्फे या शाळेला मध्यान्ह भोजन पुरवले जाते. मुलांना डब्यात खिचडी देण्यात आली होती. खिचडी खाल्ल्यानंतर काही मुलांना त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यामुळे खिचडीची तपासणी सुरू केली. त्या वेळी खिचडीत मेलेला उंदीर आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले असून, कारवाईचे आदेश दिले आहेत. परंतु, खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्यानंतर पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात सोनभद्रमध्ये एका शाळेत पोषण आहारात दूध पाणी मिसळून देत असल्याचे उघड झाले होते.