भाटिया कुटुंबीयांकडून फाशीची रंगीत तालीम

पीटीआय
शुक्रवार, 6 जुलै 2018

बुराडी परिसरातील एकाच कुटुंबातील अकरा सदस्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या घटनेप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून विचित्र माहिती उघड झाली आहे, हे सगळे कुटुंब एखाद्या विवाहसमारंभाची तयारी करावी त्याप्रमाणे मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करीत होते. फाशी घेण्यासाठी स्टूल, दोरी आदी साहित्य खरेदी करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भाटिया कुटुंब सहा दिवसांपासून फाशी घेण्याचा सराव करीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : येथील बुराडी परिसरातील एकाच कुटुंबातील अकरा सदस्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या घटनेप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून विचित्र माहिती उघड झाली आहे, हे सगळे कुटुंब एखाद्या विवाहसमारंभाची तयारी करावी त्याप्रमाणे मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करीत होते. फाशी घेण्यासाठी स्टूल, दोरी आदी साहित्य खरेदी करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भाटिया कुटुंब सहा दिवसांपासून फाशी घेण्याचा सराव करीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या हाती एक महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज लागले असून, यामध्ये भाटिया कुटुंबातील सदस्य फाशी घेण्यासाठीचे साहित्य खरेदी करताना दिसत आहेत. ललित यांची पत्नी टीना आणि श्‍वेताने नजीकच्या दुकानातून स्टूल खरेदी केला होता. या वेळी मुलांच्या हातातील विजेची तार स्पष्टपणे दिसत आहे. फाशी घेण्यापूर्वी या सर्वांनी स्वत:चे हात तारेने बांधून घेतले होते. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या लटकतात त्याच अवस्थेत भाटिया कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह अधांतरी लटकले होते. 

साहित्याची खरेदी 
ललित यांची पत्नी टीना आणि भूपेंद्र यांची पत्नी श्‍वेताने एका दुकानातून स्टूल खरेदी केला होता, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ 30 जून रात्री 10.04 वाजताचा आहे. ज्या दुकानातून या सर्व सदस्यांनी स्टूल खरेदी केले. त्या दुकानाच्या मालकानेही याला दुजोरा दिला होता. यामुळे आत्महत्येचा हा प्रयत्न सामूहिक होता, असेही यातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे ललित यांनीच दुकानातून डॉक्‍टर वापरतात ती टेप खरेदी केली होती. फाशीच्या दिवशी ललित यांनी बाहेरूनच जेवण मागविले होते, या वेळी ललितने संबंधित युवकास पैसे न देता ते त्याला भूपेंद्रकडून घेण्यास सांगितले होते. 

Web Title: Death of 11 family members in India may be ritual mass suicide