Vajpayee Death Anniversary: अटलजींनी राजकुमारीला लिहिलं होतं प्रेमपत्र पण…

अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यात राजकुमारी कौल यांचे एक विशेष स्थान होतं.
Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Atal Bihari Vajpayee Death Anniversarysakal
Updated on
Summary

अटल बिहारी वाजपेयींचं चरित्र लिहिणारे किंगशुक नाग यांनी त्यांच्या 'अटल बिहारी वाजपेयी द मॅन फॉर ऑल सीझन्स' मध्ये सांगितले, "अटलजींनी राजकुमारीसाठी एक प्रेमपत्र लिहिलं होतं आणि लायब्ररीच्या एका पुस्तकात त्यांनी राजकुमारीसाठी ते पत्र ठेवलं होतं पण त्यांना त्याचं कधीच उत्तर मिळालं नाही. खरं तर राजकुमारी यांनी त्याचं उत्तर दिलं होतं, पण ते वाजपेयींपर्यंत पोहोचू शकलं नाही”

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. अटलजींचे व्यक्तिमत्व त्यांचा हजरजबाबीपणा कायमच लक्षात राहतो. अटलजींचा जसा राजकीय प्रवास चर्चेत होता तसे त्यांचे वैयक्तीक आयुष्यही चर्चेत राहले. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीच लग्न केले नाही. याचे अनेक कारणे सांगितले जातात. पण तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची लव्हस्टोरी माहिती आहे का? अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यात राजकुमारी कौल यांचे एक विशेष स्थान होतं.

कॉलेजमध्ये वाजपेयींना राजकुमारी हक्सर भेटल्या. राजकुमारी खूप सुंदर होत्या आणि वाजपेयी त्यांच्याकडे आकर्षित झाले. राजकुमारी यांच्या मनातही वाजपेयींबाबत प्रेम भावना निर्माण झाल्या.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिचे गोदावरीत विसर्जन 

अटल बिहारी वाजपेयींचं चरित्र लिहिणारे किंगशुक नाग यांनी त्यांच्या 'अटल बिहारी वाजपेयी द मॅन फॉर ऑल सीझन्स' मध्ये सांगितले, "अटलजींनी राजकुमारीसाठी एक प्रेमपत्र लिहिलं होतं आणि लायब्ररीच्या एका पुस्तकात त्यांनी राजकुमारीसाठी ते पत्र ठेवलं होतं पण त्यांना त्याचं कधीच उत्तर मिळालं नाही. खरं तर राजकुमारी यांनी त्याचं उत्तर दिलं होतं, पण ते वाजपेयींपर्यंत पोहोचू शकलं नाही”

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिचे गोदावरीत विसर्जन 

खरं तर सुरवातीला वाजपेयींची मैत्री राजकुमारीचे भाऊ चांद हक्सर यांच्याशी होती पण वाजपेयींसोबत लग्नाला त्यांच्या घरच्यांनी नकार दिला. आरएसएसच्या शाखेत जाणाऱ्या वाजपेयी रामकुमारीसाठी योग्य वर नाही, असे कारण देण्यात आले. त्यानंतर राजकुमारी यांचा विवाह दिल्लीच्या एका कॉलेजमधील प्राध्यापक ब्रज नारायण कौल यांच्याशी करण्यात आला.

त्यानंतर वाजपेयी खासदार झाले तेव्हा त्यांचं दिल्लीत येणे जाणे सुरू असायचं या दरम्यान त्यांच्या पुन्हा राजकुमारीशी भेटी गाठी सुरू झाल्या. 80 च्या दशकात एका मुलाखतीत राजकुमारी कौल यांनी तर वाजपेयींसोबत आपले दृढ संबंध असल्याचे मान्य केले होते.

त्या म्हणाल्या होत्या, “वाजपेयींसोबत माझे दृढ संबंध आहे आणि फार कमी लोक ते समजू शकतील. वाजपेयी आणि मला माझ्या पतीला कधीही या नात्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही. माझे पती आणि माझं वाजपेयींबरोबरचं नातं पक्कं होतं”

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Emergency movie : श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी'

असं म्हणातात की राजकूमारी यांना साठच्या दशकात पतीला घटस्फोट देऊन वाजपेयी यांच्याशी विवाह करायचा होता. पण तसं शक्य नव्हतं. कारण असं केल्यास वाजपेयींच्या राजकीय जीवनावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता होती.

वाजपेयी यांना दिल्लीत मोठं सरकारी घर भेटलं त्यावेळी राजकुमारी कौल पती ब्रज नारायण कौल आणि त्यांच्या मुलीसोबत वाजपेयी यांच्या घरी राहायला आल्या होत्या.

वाजपेयींच्या 'हार नहीं मानूंगा' नावाच्या चरित्रात विजय त्रिवेदी यांनी लिहिलं, "ही अलिखित प्रेमकहाणी सुमारे 50 वर्ष चालली आणि ती लपवण्यातही आली नाही. पण तिला काही नावही मिळालं नाही. भारताच्या राजकारणात कदाचित प्रथमच पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी अशी व्यक्ती राहिली असेल, ज्या व्यक्तीला प्रोटोकॉलमध्ये स्थान देण्यात आलं नाही, पण त्यांची उपस्थिती सर्वांना मान्य होती.”

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
Atal Biopic: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर 'बायोपिक'

राजकुमारी कौल यांचं 2014 मध्ये 86 वर्षांच्या असताना निधन झालं 2009 नंतर सातत्याने आजारी असणारे अटल बिहारी वाजपेयी राजकुमारी यांच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ शकले नव्हते. राजकुमारी कौल यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातील ही सर्वात मोठी प्रेमकहाणी होती जी कायमची संपुष्टात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com