...तरी पण लग्न केले; दुसऱयाच दिवशी मृत्यू

वृत्तसंस्था
Tuesday, 23 June 2020

विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरदेव नुकताच दिल्लीहून गावी आला होता. शिवाय, लग्नाला उपस्थित असलेले 15 वऱहाडी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

पाटणा (बिहार): विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरदेव नुकताच दिल्लीहून गावी आला होता. शिवाय, लग्नाला उपस्थित असलेले 15 वऱहाडी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

विवाह उत्साहात साजरा पण नवरी ऐवजी होती...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पालीगंज गावातील युवक दिल्लीहून गावी आला होता. गावाला आल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. विवाहापूर्वी त्याला पोटदुखीचा त्रास होत होता. नियोजनाप्रमाणे त्याचा विवाह संपन्न झाला. पण, विवाहाच्या दुसऱया दिवशी सकाळी पुन्हा पोटदुखीचा त्रास वाढला. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्रास वाढतच गेल्यामुळे पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादम्यान नवरदेवाचा मृत्यू झाला. विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात लग्नाची तयारी सुरू असताना आलं वीरमरण...

दरम्यान, नवरदेवाच्या मृत्युनंतर कोरोनाच्या संशयामुळे या विवाहात सहभागी झालेल्या वऱ्हाडींची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल हाती आल्यानंतर 15 जणांना कोरोना झाल्याचे समजले. यामध्ये सात महिला, सात पुरुष आणि एका छोट्या मुलाचा समावेश आहे. या 15 कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवरदेवालाही कोरोना झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पण, अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

विवाहानंतर सासरी जाताना नवरीला उलटी आली अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of the groom on the second day of the wedding at bihar