लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना मृत्यूदंड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली जाणार आहेा. या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून, ही शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी  आज (शुक्रवार) दिली.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 12 वर्षांखालील बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉस्को कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

दरम्यान, कठुआ येथे एका आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करावा.

Web Title: Death Penalties for child sexual abuse