1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी एकाला फाशीची शिक्षा

1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी एकाला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने 34 वर्षांनंतर आज (मंगळवार) सुनावणी केली. याप्रकरणी न्यायालयाने एकाला फाशी तर दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात याप्रकरणाशी संबंधितांची बाजू ऐकल्यानंतर याबाबतचा आदेश राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मागील आठवड्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर दोषींचा गुन्हा गंभीर असून, हे कृत्य कट रचून करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय सरकारी वकील आणि पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनीही दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर दुसऱ्या बाजूने बचावपक्षाकडून दयेची विनंती करण्यात आली होती. 

दरम्यान, न्यायालयाने आज या दंगलप्रकरणी दोघांना दोषी ठरवले असून, यातील एकाला फाशी तर दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com