राम मंदिराचे निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : शिवसेना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच राफेल कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ''राफेल विमान कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो. मात्र, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोडविला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही,''.

Web Title: Deciding on building Ram Temple is not Supreme Courts Job says Shivsena Leader Sanjay Raut