उर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे 

पीटीआय
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

श्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर सरकारने काढलेले वादग्रस्त परिपत्रक दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी मागे घेण्यात आले. 
काही धार्मिक पुस्तकांची ओळख करून देण्यासंदर्भातील सरकारी परिपत्रक राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने मागे घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने आज सांगितले. हे परिपत्रक सोमवारी (ता. 22) सरकारने जारी केले होते.

त्यानुसार "भगवद्‌गीता' आणि "कोशूर रामायण' या धार्मिक पुस्तकांची उर्दू आवृत्ती खरेदी करण्याचा आदेश शालेय शिक्षण संचालनालयाला काल दिला होता. शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, महाविद्यालयांचे संचालक, ग्रंथालये व सांस्कृतिक विभागाने याच्या पुरेशा प्रती खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. उर्दू भाषेतील या पुस्तकांचे लेखन सर्वानंद प्रेमी यांनी केले आहे. राज्यपालांचे सल्लागार बी. बी. व्यास यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार हे परिपत्रक काल काढण्यात आले होते. 

'अन्य धर्मांकडे दुर्लक्ष का केले?' 
जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेकांनी याला आक्षेप घेतला. "फक्त गीता व रामायणच का? जर शाळा-महाविद्यालयांमध्ये धार्मिक पुस्तकांची ओळख करून देणे आवश्‍यक वाटत असेल तर मग ठराविक पुस्तकांचीच निवड का करण्यात आली. अन्य धर्मांकडे दुर्लक्ष का केले गेले,'' असा सवाल उमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर केला आहे. 

Web Title: The decision of allocating Bhagwatgita in Urdu is back in Kashmir