बेळगावात प्रवेशद्वारावर शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बेळगाव - शहराच्या प्रवेशद्वारावर केएलई हाॅस्पीटलजवळ राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. या पुतळ्यासाठी एक कोटी रूपये निधी राखीव ठेवण्यात आला.

बेळगाव - शहराच्या प्रवेशद्वारावर केएलई हाॅस्पीटलजवळ राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. या पुतळ्यासाठी एक कोटी रूपये निधी राखीव ठेवण्यात आला. या पुतळा उभारणीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही झाला.

महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा विषय चर्चेला घेतल्यावर गटनेते संजय शिंदे, माजी महापौर किरण सायनाक, सरला हेरेकर, शांता उप्पार व वैशाली हुलजी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले व पुतळा उभारण्यास पाठींबा दिली. यासाठी समिती स्थापन करताना पारदर्शकता ठेवली जावी. शिवाय या सभागृहाची मुदत संपण्याआधीच पुतळा उभारणी करून अनावरण व्हावे, अशी विनंती दीपक जमखंडी यानी केली. शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या जीवनकार्याची माहिती मराठी व कन्नड भाषेत प्रदर्शित केली जावी, अशी मागणी मेघा हळदणकर यानी केली.

Web Title: decision to build a statue of Shahu on the entrance of Belgaum city