कर्नाटकात राज्यपालांनी घेतलेला निर्णय असंविधानिक : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

राज्यपाल वाला यांनी असंविधानिक काम केले आहे. भाजपने धोका देऊन सरकार स्थापन केले आहे. त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी सरकार स्थापन केले, असे राहुल गांधींनी ट्विटरवरून सांगितले.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजपला शनिवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, राज्यपाल वजूभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा घेतलेला निर्णय असंविधानिक आहे, असे सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांना राज्यपाल वजूभाई वाला यांना काल (गुरुवार) शपथ दिली. राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेले निमंत्रण आणि त्यांना दिलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हे सर्व असंविधानिक आहे, असे राहुल गांधींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यपाल वाला यांनी असंविधानिक काम केले आहे. भाजपने धोका देऊन सरकार स्थापन केले आहे. त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी सरकार स्थापन केले, असे राहुल गांधींनी ट्विटरवरून सांगितले.

दरम्यान, त्यांनी आता कायदेशीर बाबी थांबवल्या आहेत. आता ते 'मनी अँड मसल पॉवर'च्या जोरावर बहुमत सिद्ध करतील, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

Web Title: The decision taken by the Governor in Karnataka is unconstitutional says Rahul Gandhi