esakal | दिल्लीत तीन महिन्यांसाठी आणीबाणीच लावा : आप

बोलून बातमी शोधा

Shohaib Iqbal

दिल्लीत तीन महिन्यांसाठी आणीबाणीच लावा : आप

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडणाऱ्या राजधानी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याने पुढील तीन महिन्यांसाठी तरी आणीबाणी लावावी आणि राष्ट्रीय यंत्रणेकडे दिल्लीची सूत्रे द्यावीत अशी मागणी आता सत्तारूढ आम आदमी पक्षातूनच होऊ लागली आहे.

रूग्णालये आणि ऑक्सिजनसाठी रस्तोरस्ती फिरणाऱ्या सामान्य नागरिकांबरोबरच उच्चपदस्थही हतबल झाले आहेत. मोदी सरकारच्या नव्या कायद्यानुसार दिल्लीत आता ''सरकार'' या संकल्पनेचे खरे उत्तरदायित्व मिळालेले नायब राज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आज अधिकृतरीत्या सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून एम्समध्ये दाखल आहेत.

दिल्लीतील परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयानेही नोंदवले. तुम्हाला झेपत नसेल तर सारी सूत्रे केंद्रीय यंत्रणेकडे द्या, असे न्यायालयाने केजरीवाल सरकारला नुकतेच फटकारले होते. त्यापाठोपाठ स्वपक्षातूनही केजरीवाल यांना घरचा आहेर मिळू लागला आहे.

हेही वाचा: 'ऑक्सिजन सिलिंडर मिळाले नाही तर ते मरतील'; वकीलाला कोर्टात रडू कोसळलं

आम आदमी पक्षाचे आमदार शोएब इक्बाल यांनी दिल्लीत राष्ट्रपती शासन लावण्याची जाहीर मागणी केली. ते म्हणाले, लोकांना रुग्णालयात उपचार आणि ऑक्सिजनही मिळत नाही. लोकप्रतिनिधी पुरते हतबल झालेले आहेत. किमान तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावली तर परिस्थिती आटोक्यात येईल अशी आशा माझ्यासारख्या आमदाराला वाटते.

रोज अनेक लोक रूग्णालयात खाटा मिळाव्यात यासाठी आपल्याकडे याचना करतात. त्यांचे दुःख पाहवत नाही, पण मी काहीही करू शकत नाही. त्यामुळे आमदार असल्याचीही लाज वाटते.

- शोएब इक्बाल, आम आदमी पक्ष आमदार