JNU मध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, सडल्याने ओळखही पटेना

JNU
JNUSakal

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र, व्यक्तीचे वय ४० ते ४५ च्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Death In JNU)

शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पोलिसांना मृतदेहाची माहिती मिळाली. तपासासाठी गुन्हे आणि न्यायवैद्यक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठातील सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने अहवाल दिला आहे. मृतदेह जेएनयूमधील कोणाचा नसावा, असं यामध्ये प्रथमदर्शनी नमूद करण्यात आलं आहे.

'यमुना वसतिगृहाजवळील जंगलात हा मृतदेह आढळून आला आहे. काही विद्यार्थी जंगलात फिरायला गेले होते. त्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याने त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com