यंदाची दिवाळी जवानांना समर्पित करा: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "यंदाची दिवाळी जवनांना समर्पित करा' असे आवाहन आज (रविवार) "मन की बात' या कार्यक्रमाद्वारे केले.

नवी दिल्ली : कर्तव्य बजावत असलेले सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जवान आपले रक्षण करत असल्यामुळे आपण येथे आनंदात दिवाळी साजरी करू शकतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "यंदाची दिवाळी जवनांना समर्पित करा' असे आवाहन आज (रविवार) "मन की बात' या कार्यक्रमाद्वारे केले.

"मन की बात' कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या "मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा
  • दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळविलेल्या विजयाचा उत्सव.
  • दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी केली जाते. दिवाळी हा लोकांना एकत्र आणणारा उत्सव..
  • आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि जवानांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. ही दिवाळी आपण जवानांना समर्पित करूयात.
  • आपण आपल्या साऱ्या प्रथा आणि परंपरा विसरून मुलगा आणि मुलगी यांना समान मानायला हवा आणि त्याच मार्गाने आपण वेगाने वाटचाल करत आहोत.
Web Title: Dedicate diwali to Jawan : Narendra Modi

व्हिडीओ गॅलरी