
पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक महान शास्त्रीय, नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते होते. त्यांना सर्वजण मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणूनच ओळखतात. प्रसिद्ध असलेले दीनानाथ मंगेशकर यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
मास्टर दीनानाथांचा जन्म 29 डिसेंबर 1900 रोजी गोव्यातील मंगेशी या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेशभट तर आईचे येसूताई अभिषेकी होते. दीनानाथांना तीन भावंडे होती. विजया, कमलनाथ आणि शेवटची देवयानी. पण, दीनानाथांची दोन्ही लहान भावंडे लहान वयातच देवाघरी गेली.
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. दीनानाथ बाबा माशेलकर, गायनाचार्य पंडित रामकृष्ण बुवा वाजे आणि पंडित सुखदेव प्रसाद यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले.
१९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली.
१९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नवे शिकण्याती आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.
दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता.
वयाच्या २१ व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर यांनी १९२२ मध्ये नर्मदा यांच्याशी विवाह केला. त्यावेळी त्या १९ वर्षांच्या होत्या. त्यांचे नाव श्रीमती असे ठेवण्यात आले. श्रीमती यांनी एका मुलीला जन्म दिला आणि त्यांनी तिचे नाव लतिका ठेवले. लतिका लहानपणीच वारली. यानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
पत्नीच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर यांनी 1927 मध्ये श्रीमती यांची बहीण शेवंती यांच्याशी विवाह केला. त्यानंतर शेवंती आणि दीनानाथ यांना लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशी पाच मुले झाली.
अंधेरी दुनिया,कृष्णार्जुन युद्ध,भक्त पुंडलिक या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे २४ एप्रिल १९४२ मध्ये वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1993 मध्ये, भारत सरकारने दीनानाथ मंगेशकर यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि देशभक्तीपर गीतांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करणारे टपाल तिकीट समर्पित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.