

El Nino Maharashtra Rain alert
esakal
Deep Depression Weather : महाराष्ट्रात पावसाला पोषक ठरणारी 'डीप डिप्रेशन' ही वादळी प्रणाली मध्य भारताकडे सरकत असल्याने अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्याला यंदाच्या हंगामातील पहिला चांगला पावसाचा टप्पा अनुभवायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.