
आम्ही लाल किल्ल्यातील कोणत्याच साहित्याचे नुकसान केलेले नाही. पोलिसांनी आम्हाला तुम्हाला जे काही करायचे ते करा. पण शांततेने करा आणि येथून जावा, असे सांगितले.
नवी दिल्ली- 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी जबाबदार ठरवला जात असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धूने फेसबुकवर लाइव्ह येत शेतकरी नेत्यांना इशारा दिला आहे. वारंवार गद्दार म्हटले जात असल्यामुळे नाराज सिद्धूने शेतकरी नेत्यांना इशारा देताना म्हटले की, जर मी आतली गोष्ट सांगण्यास सुरुवात केली तर या नेत्यांना पळायला रस्ताही मिळणार नाही. हा माझा डायलॉग समजू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. मानसिकता बदला.
सिद्धूने म्हटले की, माझ्या बाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. मला काही स्पष्ट सांगण्याची वेळ आता आलेली आहे. दिल्लीत 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याबाबत तो म्हणाला की, युवकांना ट्रॅक्टर मार्चसाठी बोलावलं होतं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीतील ठरलेल्या मार्गावर परेड करण्याबाबत चर्चा केली. यावर युवकांनी रोष जाहीर केला तर शेतकरी नेत्यांनी यापासून अंतर राखले.
हेही वाचा- सरकारने डोळे का झाकलेत? काहीच का करत नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
शेतकरी नेते अहंकारी असून ते सरकारची भाषा बोलतात अशी टीका केली. शेतकऱ्यांनी एकता राखण्याचे आवाहन करत 26 जानेवारीची घटना स्मरणात ठेवण्याचे आवाहनही त्याने केले. शेतकरी नेत्यांनी याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे त्याने म्हटले. यावेळी तो वारंवार लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याबाबत बचाव केला. बाइकवर पळून जाण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरही त्याने भाष्य केले.
आम्ही लाल किल्ल्यातील कशाचेच नुकसान केलेले नाही. पोलिसांनी आम्हाला तुम्हाला जे काही करायचे ते करा. पण शांततेने करा आणि येथून जा, असे सांगितले. यावेळी सिद्धूने भाजप, आरएसएस आणि काँग्रेसबरोबरचे आपले संबंधही नाकारले.
हेही वाचा- भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया