JNU Attack:जेएनयूच्या आंदोलनात उतरली दपिका; जयभीमच्या घोषणा सुरू असतानाच आगमन

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 January 2020

दीपिकाने आईशीची यावेळी भेट घेतली. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे.

नवी दिल्ली JNU Campus : एरवी कायम प्रकाशझोतात राहणारी आणि कोणत्याही राजकीय विषयापासून दूर राहणारी दीपिका पदुकोन Deepika Padukone आज, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दाखल झाली. जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहे. त्या कॅम्पसमधील आंदोलनात दीपिकानं सहभागी होऊन सगळ्यांनाच धक्का दिलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात 34 विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी संघटनेची आईशी घोष ही जखमी झाली आहे. दीपिकाने आईशीची यावेळी भेट घेतली. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे. कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू असताना कन्हैय्या जय भीम जय भीमच्या घोषणा देत होता. त्याचवेळी दीपिका आंदोलनस्थळी दाखल झाली. दीपिकानं केवळ आईशीसोबत काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर ती निघून गेली. यावेळी तिनं मीडियाशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही. 

आणखी वाचा - जेएनयू हल्ल्याची या हिंदू संघटनेने घेतली जबाबदारी

आणखी वाचा - जेएनयूत हल्ला करणारी ती तरुणी आहे तरी कोण?

काय घडलं रविवारी?
रविवारी जेएनयूमधील साबरमती होस्टेलच्या बाहेर 200 जणांचा जमाव एकत्र आला होता. यात काही मुलींचाही समावेश होता. सायंकाळी सातच्या सुमारास हा जमाव एकत्र आला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या जमावातील तरुणांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात काही प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहे. विद्यार्थी संघटनेने हा हल्ला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला. तर, हिंदू राष्ट्र दल या संघटनेने आज, जेएनयूतील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone visits jnu campus protest meets aishi ghosh