जेएनयुतील हल्ल्याची 'या' हिंदू संघटनेने घेतली जबाबदारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले होते.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) गुंडांकडून विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षा दलाकडून घेण्यात आली आहे. देशविरोधी घोषणा दिल्यास यापुढेही असेच होईल, असा इशाराही हिंदू रक्षा दलाकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारे हिंदु रक्षा दलाचे भुपेंद्र तोमर यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये ते म्हणत आहेत, की देशात अशी कृत्ये आम्ही सहन करणार नाही. देशविरोधी कारवाया हिंदू सरक्षा दलाकडून सहन केल्या जाणार नाहीत. जेएनयुमध्ये झालेल्या हल्ल्याची आम्ही जबाबदारी घेतो. जेएनयु समाजवाद्यांचा अड्डा बनला आहे. यापुढेही देशविरोधा कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर असेच होईल. जेएनयुमध्ये हल्ला केलेले सर्व आमचे कार्यकर्ते होते. भारतमातेसाठी आम्ही जीव अर्पण करतो. धर्माविरोधात कोणीही बोलले तर आम्ही त्याला धडा शिकवू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Raksha Dal Takes Onus for JNU Attack Threatens Other Varsities on Anti-National Activities