बिहारमध्ये काय पडसाद उमटले झारखंडच्या पराभवाचे वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 26 December 2019

मित्रपक्षांशिवाय पर्याय नाही
बिहारमध्ये पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सत्तेच्या बाहेर राहावे लागल्याने भाजप आता आपल्या मित्रपक्षांना नाराज करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बिहारमधील २०१५ ची विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली होती. त्या वेळी त्यांना केवळ ५६ जागा मिळाल्या होत्या. यामुळे आगामी निवडणुकीत मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हे नुकसानकारक ठरू शकते, याची जाणीव भाजपला आहे.

पाटणा - झारखंड निवडणुकीतील पराभवाचे पडसाद बिहारमध्येही पडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने ‘बिहारमध्ये नितीशकुमार नको,’ अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. यासाठी नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, झारखंडमधील पराभवानंतर संयुक्त जनता दलानेच (जेडीयू) भाजपला सल्ले देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘भाजपने आपल्या मित्रपक्षांशी समन्वय राखून त्यांच्यासह झारखंडमध्ये निवडणूक लढविली असती तर हा दिवस दिसला नसता,’ अशा कानपिचक्‍या ‘जेडीएस’ने दिल्या आहेत. यावरूनच बिहारच्या राजकारणाचा रोख बदलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

भाजप मंत्री म्हणतात, राहुल-प्रियांका तर लाईव्ह पेट्रोल बॉम्ब

झारखंडमधील भाजपचा मित्रपक्ष ऑल झारखंड स्टुडंट युनियन (एजेएसयू) यांची युती न होता, हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तसेच बिहारमधील भाजपचे आघाडीतील पक्ष ‘जेडीएस’ आणि लोकशाही जनता पक्षांमध्येही बिहारमध्ये युती होऊ शकली नव्हती. तेथे या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नसले तरी, ‘जेडीएस’चे प्रवक्ते संजयसिंह यांनी भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना बरोबर घ्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The defeat of Jharkhand falls in Bihar