
तिन्ही सैन्य दलांचे संयुक्त थिअटर कमांड स्थापन करणार, संरक्षण मंत्र्यांची घोषणा
देशाच्या तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी केंद्र सरकार एक संयुक्त थिअटर कमांड स्थापन करणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी ही घोषणा केली. जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमने भारतीय सशस्त्र दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिंग म्हणाले की (कारगिलमधील ऑपरेशन विजयच्या संयुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर) देशात एक संयुक्त थिअटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. (defence minister rajnath singh announces setting up of joint theatre commands of tri services)
राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, संरक्षण उपकरणांचा जगातील सर्वात मोठा आयातदार ते भारत निर्यातदार होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिल शहीदांचे सर्वोच्च बलिदान देश विसरू शकत नाही. शहीद जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण सन्मान देणे हे समाज आणि लोकांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
स्थापनेसाठी पाच वर्षे लागू शकतात
भारतीय लष्कराचे थिअटरायझेशन मॉडेल, ज्याची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती, या मार्फत आणीबाणीच्या काळात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत मिळू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. थिअटर कमांड स्थापन करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागू शकतात. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिन्ही सेना प्रमुखांमध्ये समन्वय असताना थिएटर कमांडचा योग्य वापर युद्धादरम्यान होतो. याद्वारे गरज पडल्यास तिन्ही दलांची संसाधने आणि त्यांची शस्त्रे एकाच वेळी वापरता येतील.
हेही वाचा: भाजप प्रवक्त्याकडून सोनिया गांधीबद्दल अपशब्द; कॉंग्रेसची नड्डांकडे तक्रार
संरक्षण उत्पादनाचा संदर्भ देताना सिंग म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठा (संरक्षण उत्पादनांचा) आयातदार होता.आज भारत हा जगातील सर्वात मोठा आयातदारच नाही तर संरक्षण निर्यातीत सामील असलेल्या अव्वल 25 देशांपैकी एक आहे. सिंग म्हणाले की, देशाने 13,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात सुरू केली आहे आणि 2025-26 पर्यंत ती 35,000 वरून 40,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
हेही वाचा: "ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम", जूना दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका
Web Title: Defence Minister Rajnath Singh Announces Setting Up Of Joint Theatre Commands Of Tri Services
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..