राजनाथ सिंह दोन दिवसाच्या लडाख दोऱ्यावर; सुरक्षा यंत्रणेचा घेणार आढावा

Defence minister Rajnath Singh in Leh amid India-China LAC stand-off
Defence minister Rajnath Singh in Leh amid India-China LAC stand-off
Updated on

श्रीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज लेहला रवाना झाले असून ते दोन दिवसाच्या लडाख आणि जम्मू काश्मिर दौऱ्यावर आहेत. भारत-चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख, संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी दिल्लीत अनेकदा बैठक घेतली आणि सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, आज राजनाथ सिंह संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यासोबत ते लेहला पोहचले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गलवान खौऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजनाथ सिंह लेहला जाणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर राजनाथ सिंह आज लेहला पोहोचले असून ते आज (ता. १७) राजनाथ सिंह आज सुरक्षा यंत्रणेचा
आढावा घेणार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी लडाखला गेले होते. मोदींनी लडाखमध्ये उपस्थित सैन्यालाही संबोधित केले होते. यावेळी पंतप्रधानांनी सैन्य दलाच्या जवानांना प्रोत्साहन दिले आणि रुग्णालयात जखमी सैनिकांची भेट घेतली होती. पंतप्रधानांच्या या रॅलीनंतरच चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष क्षेत्रावरून मागे जाण्याची चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले. लडाखच्या गलवान खौऱ्यात 15 जून रोजी एलएसीवर दोन्ही देशांत चकमक झाली. यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. चीनमधील 43 सैनिकही ठार झाल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com