केंद्र सरकारकडून BRO ला हिरवा कंदील; लडाखमधील नवा बोगद्यासाठी दिली परवानगी

केंद्र सरकारकडून BRO ला हिरवा कंदील; लडाखमधील नवा बोगद्यासाठी दिली परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation - BRO) ला मनाली ते लेहपर्यंत 5,091 मीटर उंचीचा शिंकुन ला मधून 4.25 किलोमीटर बोगदा तयार करण्यास सांगितले आहे. हा बोगदा 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. साऊथ ब्लॉक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ (NHIDCL) च्या ऐवजी BRO च्या प्रस्तावाच्या बाजूने निर्णय घेतला आहे. शिंकुन ला अंतर्गत 13.5 किमी बोगद्यासह संपूर्णपणे नवीन रस्ता तयार करण्याची शिफारस केली जात होती. (Defence ministry the BRO tunnel under Shinkun La in Ladakh)

केंद्र सरकारकडून BRO ला हिरवा कंदील; लडाखमधील नवा बोगद्यासाठी दिली परवानगी
'हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका'

मार्च 2021 मध्ये BRO आणि NHIDCL या दोघांनी मंत्र्यांसमोर सादरीकरण केले होते. दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने BRO च्या बाजूने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे या प्रकल्पात सहभागी असलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसला असल्याने हा निर्णय कागदोपत्री ठेवता आला नाही, असं एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. चिनी सैन्याने मे 2020 मध्ये लडाखमध्ये प्रवेश करण्यापूर्वी २०१ 2017 पासून NHIDCL या प्रोजेक्टसाठीचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत आहे.

असं समजतंय की, BRO बोगद्याच्या बांधकामाची एकूण किंमत ₹ 1000 कोटी असेल. यामध्ये डिझाइन आणि आवश्यक इलेक्ट्रोमेकॅनिकल फिटिंग्जच्या खर्च देखील समाविष्ट असेल. 4.25 किमीच्या बोगद्यात केळीच्या पंख्यांचा वापर करून व्हेटिंलेटरची सोय केलेली असेल. यासाठी कमीतकमी वीज व ऑपरेशनल खर्च येईल, असं म्हटलं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com