डेहराडून: बनावट चकमकप्रकरणी सात पोलिसांना जन्मठेप

delhi high court
delhi high court

नवी दिल्ली - बनावट चकमकीत एका युवकाच्या मारल्याच्या आरोपावरुन निलंबित केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) सात पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील अन्य दहा निलंबित आरोपीच्या शिक्षेचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

डेहराडून येथे जुलै 2009 मध्ये पोलिसांनी बनावट चकमक घडवून रणबीर सिंग (वय 22) या व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्याची हत्या केली होती. या प्रकरणी न्या. एस. मुरलीधर आणि न्या. आय. एस. मेहता यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाने सात निलंबित पोलिसांच्या खटल्यावर 2014 मध्ये दिलेला निकाल कायम ठेवला.

पोलिसांनी आपली बाजू मांडताना न्यायालयात सांगितले होते की, रणबीर सिंग व अन्य दोघेजण दरोडा घालण्याच्या तयारीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com