

Delhi Cafe Girl Assault Case
Esakal
दिल्लीतील प्रीत विहार परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर अन्य तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॅफेमध्ये काम करत होते. सर्वजण एकत्र पार्टी करण्यासाठी गेले होते.