Delhi AIIMS Hospital Fire: एम्सला लागलेल्या आगीत काय नुकसान झालंय? प्रशासनानं दिली अपडेट

दिल्लीतील एम्स All India Institute Of Medical Science (AIIMS) रुग्णालयाच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आलीये.
aiims
aiims esakal

Delhi AIIMS Hospital Fire update

नवी दिल्ली- दिल्लीतील एम्स All India Institute Of Medical Science (AIIMS) रुग्णालयाच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आलीये. सदर घटनेनंतर एकच खळबळ उडाली. माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एम्स रुग्णालयाकडून या घटनेबाबत अपडेट देण्यात आली आहे. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत, असं एम्सकडून सांगण्यात आलंय. एम्सने यासंदर्भात पत्र जाहीर केलं आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षात भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर या कक्षातील सर्व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 6 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत काही कळू शकलेलं नाही.

aiims
Sambhaji Bhide: 'संभाजी भिडे यांचं नाव वगळा'; जनहित याचिकाकर्त्यांना हाय कोर्टाचे निर्देश

एम्स रुग्णालयातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. माहितीनुसार आग आटोक्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावर 31 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यांना सुरक्षितपणे इतर ठिकाणच्या आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच लागून असलेल्या वॉर्डमधील रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com