हवा प्रदुषणाचे संकट; दिल्लीसह चार राज्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव | Delhi Air Pollution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवा प्रदुषणाचे संकट; दिल्लीसह चार राज्यांना WFH चा प्रस्ताव

दिल्लीत मंगळवारी हवेची गुणवत्ता 396 एक्युआय इतकी होती. तर सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा हवेची गुणवत्ता ही खूप खराब होती.

हवा प्रदुषणाचे संकट; दिल्लीसह चार राज्यांना WFH चा प्रस्ताव

राजधानी दिल्लीवर हवा प्रदुषणाचे संकट ओढावले असून यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. सुप्रीम कोर्टानेसुद्धा दिल्लीला सुनावले असून आता दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी रेड लाइट ऑन, गाडी ऑफ अशी मोहिम आणखी १५ दिवस सुरु राहणार असल्याचं सांगितलं. तसंच आणखी एक प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार एनसीआरमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं असं म्हटलं आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी याबाबतच माहिती दिली. ते म्हणाले की, १८ नोव्हेंबरला संपणाऱ्या रेड लाइट ऑन गाडी ऑफ मोहिमेला आणखी १५ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत असणार आहे.

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक झाली. यामध्ये दिल्ली सरकारने असा प्रस्ताव मांडला की, एनसीआरमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात यावे. तसंच बांधकामाची कामे थांबवायला हवीत. त्यासोबतच उद्योगही बंद ठेवायला हवेत अशी माहिती गोपाल राय यांनी दिली.

हेही वाचा: कॅगच्या मुख्यालयात PM मोदींच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणाऱ्या धानामुळे होणारं प्रदुषण हे ४ टक्के इतकं आहे. तर इतर गोष्टींमुळे ३५ ते ४० टक्के इतकं प्रदुषण होतं. केंद्राची आकडेवारी आम्हाला समजली नाही. आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत स्षटीकऱण मागितलं असल्याची माहिती गोपाल राय यांनी दिली.

दिल्लीत मंगळवारी हवेची गुणवत्ता 396 एक्युआय इतकी होती. तर सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा हवेची गुणवत्ता ही खूप खराब होती. गाझियाबादमध्ये ३४९, ग्रेटर नोएडात ३५९, गुडगावमध्ये ३६३ आणि नोएडात ३८२ इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेली. दिल्लीत प्रदुषण नियंत्रणासाठी १८ ऑक्टोबपासून रेड लाइट ऑन गाडी ऑफ मोहिम सुरु करण्यात आली होती.

loading image
go to top