

दिल्लीत थंडी वाढत आहे आणि तापमानात सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे प्रदुषणाने उच्चांक गाठला आहे. आज दिल्लीचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस दिल्लीत धुके राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी आणखी तीव्र होईल.