

Passengers waiting at Delhi Airport after a major ATC system glitch caused delays and cancellations; operations now gradually returning to normal.
esakal
Summary
दिल्ली विमानतळावरील ३६ तासांपूर्वी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर उड्डाण सेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहेत.
शुक्रवारी सुमारे ९०० उड्डाणांना विलंब झाला आणि २० उड्डाणे रद्द करण्यात आली.
शनिवारी १२९ उड्डाणे (५३ आगमन, ७६ प्रस्थान) उशिराने आली, म्हणजे परिस्थिती सुधारली आहे.
Delhi Airport News : दिल्ली विमानतळावरील विमान सेवा आता हळूहळू सामान्य होत आहेत.सुमारे ३६ तासांपूर्वी झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडानंतर शनिवारी परिस्थितीत सुधारणा झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शनिवारी एकूण १२९ विमाने (५३ आगमन आणि ७६ उड्डाणे) उशिराने आली. शुक्रवारी ही संख्या जवळपास ९०० होती. तर २० उड्डाणे रद्द करण्यात आली होती.