केसाच्या विगमध्ये लपवले 30 लाखांचे सोने: प्रवाशाला अटक; पाहा व्हिडीओ

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर डोक्यातील केसाच्या विगमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे.
Gold Smuggling
Gold SmugglingSakal

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर डोक्यातील केसाच्या विगमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. हा व्यक्ती अबूधाबी वरुन आला असून त्याच्याकडे ३० लाख पन्नास हजारांचे सोने आढळून आले आहे. त्या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सीमाशुल्क आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

डोक्यातील केसाच्या विगमध्ये जवळपास ६३० ग्रॅम वजनाचे सोने त्या प्रवाशाने लपवले होते. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करत डोक्यातील विगमधून सोनं काढतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर प्रवाशाने आपल्या खऱ्या केसांना काढून त्यावर ६३० ग्रॅम वजनाचे सोने लपवले आणि त्यावर केसाचा विग लावला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक विग काढत सोनं बाहेर काढून हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. सदर व्यक्तीला तात्काळ अटक करुन त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान याअगोदरही अशा अनेक घटना घडल्या असून जानेवारीमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर दुबईवरून येणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्या व्यक्तीने आपल्या चमड्याच्या पट्ट्याच्या आतमध्ये जवळपास एक कोटींहून अधिक किंमतीचे सोने लपवले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com