आजपासून दिल्लीत अण्णा हजारेंचे आंदोलन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवी दिल्ली - जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत रामलीला मैदानात आज (शुक्रवार) पासुन बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत. 

सकाळी 9 वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा राजघाटाकडे निघणार आहेत. राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर अण्णा रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. अण्णांच्या या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे.

मात्र, या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून भाजपने बरेच प्रयत्न केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीही काल रात्री अण्णांसोबत महाराष्ट्र सदनात चर्चा केली. मध्यरात्रीपर्यंत या वाटाघाटी सुरू होत्या. मात्र अण्णांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याने भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

Web Title: delhi anna hazare indefinite hunger strike at ram lila maidan against modi government for lokpal farmers issue