

Thick smog engulfs Delhi as AQI touches 491, reducing visibility and causing severe breathing problems for residents.
esakal
Summary
दिल्ली-एनसीआरमध्ये AQI ४९१ वर पोहोचल्याने हवा ‘अत्यंत गंभीर’ पातळीवर गेली आहे.
वाढत्या वायुप्रदूषणामुळे श्वसन व फुफ्फुसांच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दाट धुके आणि प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत असून खोकला दीर्घकाळ टिकत आहे.
दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) दाव्यानुसार, परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४९१ असून, त्याचे वर्गीकरण 'अत्यंत गंभीर' असे करण्यात आले आहे. ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या प्रदूषणाचा विशेषतः फुफ्फुसांच्या आजार असलेल्यांना त्रास होत आहे. दिल्लीतील ही विषारी हवा श्वसनाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे, ज्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण होत आहे. एम्सच्या दाव्यानुसार,परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की क्लिनिकच्या बाहेर रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.