esakal | पदाची अपेक्षा नको, आधी कर्म करा - केजरीवाल
sakal

बोलून बातमी शोधा

अरविंद केजरीवाल

पदाची अपेक्षा नको, आधी कर्म करा - केजरीवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल हे विपश्‍यना करून पुन्हा दिल्लीच्या सेवेस रुजू झाले आहेत. दहा दिवस ध्यानधारणा केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत आध्यात्मिक संदेश दिला आहे. पदाची अपेक्षा करू नका, ते मिळेलच; पण आधी कर्म करा, असे सांगत कार्यकर्त्यांना त्यांनी ‘कर्मण्येवाधिकारस्ते...’चा मंत्र दिला. भगतसिंग यांच्यासारखे बलिदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संघर्ष करण्यासाठी आमचा कार्यकर्ता तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

केजरीवाल यांनी डिजिटल माध्यमाद्वारे पक्षाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. पक्षाचे ब्रीद हे सेवा आणि बलिदान आहे. त्यामुळे भगतसिंग आणि डॉ. आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचे आहे, असे सांगताना माझा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मला पद, प्रतिष्ठा मिळेल, असा विचार त्यांनी केला असता तर स्वातंत्र्य मिळाले नसते. त्यांनी अपेक्षा न ठेवता सर्वोच्च बलिदान दिले. त्याचा मार्गाने जाण्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याला तयार राहावे लागेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा: दिल्लीत ‘टू प्लस टू’ चर्चा; अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री भारतात दाखल

‘आप’ मध्ये कधीही अशी इच्छा ठेऊ नका की मला पद मिळेल, मला तिकीट मिळेल. आपल्याला खूप काम करायचे आहे. आपल्याला भागात चांगले काम करीत राहा. कोणतेही पद मिळाले म्हणून आनंदी होऊ नका, तर तुम्ही अव्याहतपणे करीत असलेल्या कामातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे येऊन पद मागत असाल, तर त्या पदासाठी तुम्ही पात्र नाही आहात. तुमच्या मनात पदाचा अपेक्षा निर्माण झाली म्हणजे तुम्ही स्वार्थीपणे विचार करू लागला आहेत. त्यामुळे असे काम करा की पक्षानेच तुमच्याकडे येऊन, तुम्ही हे पद सांभाळा असे म्हटले पाहिजे, असे आवाहन केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना केले. केजरीवाल यांनी नेत्यांना आदर्शचा संदेश देताना गीतेचा सारही सांगितला. ते म्हणाले, ‘‘आपल्या समाजाचा नेता असतो, त्याचे आचरण भ्रष्ट असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. आज आपला देश आपल्याकडे प्रामाणिक पक्ष म्हणून पाहिले जाते. शिक्षण सुधारणेचा विषय येतो, त्यावेळी आम आदमी पक्षाचे नाव घेतले जात. आपल्याला या पद्धतीने काम करीत पुढे जायचे आहे.’’

राजकारण बदलासाठी ‘आम आदमी पक्ष’

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उदाहरण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. आपल्या देशात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चक्र अजूनही आहे, असे अण्णा म्हणत असत. आम आदमी पार्टी हे राजकारण बदलण्यासाठीच तयार झाली आहे. येनकेन प्रकारे सत्ता हे आपले उद्दिष्ट नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. प्रत्येकाने मी समाजाची कशाप्रकारे सेवा करू शकतो, हाच विचार प्रत्येकवेळी आपल्यासमोर असला पाहिजे, अशी खूणगाठ प्रत्येकाने बांधावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

loading image
go to top