Delhi Elections : दिल्लीत काँग्रेसला झटका; 'इतक्या' उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

10 हजार द्यावे लागते डिपॉझिट

- 16 टक्के लागतात मतं

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी झालेला पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा आपचे सरकार आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला असून, काँग्रेसच्या तब्बल 63 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्ष, भाजप आणि त्यानंतर काँग्रेस यामध्ये लढत पाहिला मिळाली. मात्र, काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 66 जागांसाठी उमेदवार दिले होते. त्यापैकी 63 जागांवर उभ्या असलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Delhi Elections : भाजपच्या पराभवाची मालिका आता सुरु : शरद पवार

10 हजार द्यावे लागते डिपॉझिट

राज्यात जेव्हा विधानसभा निवडणूक होत असते तेव्हा उमेदवारांना 10 हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. आवश्यक तेवढी मतं मिळाली नाही तर संबंधित उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले जाते.

Delhi Elections : दिल्लीतील पराभवावर भाजपची प्रतिक्रिया; नड्डा म्हणाले...

16 टक्के लागतात मतं

संबंधित उमेदवारांना एकूण मतांच्या 16 टक्के मतं मिळवणे गरजेचे असते. मात्र, ते शक्य झाले नाही तर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Assembly Elections 2020 Congress loses deposit on 63 seats