

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. दिल्ली विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर निकाल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिल्ली विधानसभेसाठी ११ जिल्ह्यात ७० जागांसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत १.५५ कोटी मतदार आहेत.