hate speech : दिल्ली विधानसभा समितीने फेसबुक अधिकाऱ्याला धाडले नोटीस

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 September 2020

मागील महिन्यात दिल्ली विधानसभेतील शांती आणि सौदार्ह समितीकडे फेसबुकने द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. फेसबुक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्यासंदर्भात समितीसमोर तीन साक्षीदारांनी आपले म्हणने प्रत्यक्षात मांडले होते. 

नवी दिल्ली:  देशाच्या राजधानीत द्वेष पसरवण्याच्या (Hate Speech) प्रकरणात दिल्ली विधानसभेतील शांती आणि सौदार्ह समितीने फेसबुकच्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे. या समितीने फेसबुकचे भारतातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संस्थापक अजीत मोहन (Ajit Mohan) यांना 15 सप्टेंबर रोजी समितीसमोर उपस्थितीत राहण्यास सांगितले आहे.  दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी फेसबुकच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली विधानसभेतील समिती करत आहे. राजधानीत उसळलेली दंगल फेसबुकमुळे भडकली, असा आरोप समितीने केला आहे. याप्रकरणात फेसबुक इंडियाची (Facebook India) बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.  

लष्करात जवान आणि अधिकाऱ्यांच्या जेवणात दुजाभाव का? राहुल गांधींचा सवाल

समितीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली दंगलीसंदर्भात जे पुरावे समोर येत आहेत त्याच्या आधारावर फेसबुकही आरोपी असल्याचे दिसते.  मागील महिन्यात दिल्ली विधानसभेतील शांती आणि सौदार्ह समितीकडे फेसबुकने द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. फेसबुक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्यासंदर्भात समितीसमोर तीन साक्षीदारांनी आपले म्हणने प्रत्यक्षात मांडले होते. 

''CM उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना अयोध्येत विरोधाचा सामना करावा लागेल"

समितीचे अध्यक्ष राख चड्ढा म्हणाले होते की, फेसबुकमध्ये  उच्च पदावर असलेले काही अधिकारी भाजपसाठी काम करत आहेत. द्वेषपूर्ण कंटेंट जाणीवपूर्वक फेसबुकवर काढला जात नाही.  यापूर्वी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील सूचना आणि तांत्रिक प्रकरणातील स्थायी समितीने फेसबुकला समन्स बजावले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi assemblys committee sends summon to facebook india official for hate speech