
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. जिवंत पक्ष्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय गाझीपूर मंडी दहा दिवस बंद राहील.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. जिवंत पक्ष्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय गाझीपूर मंडी दहा दिवस बंद राहील.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केजरीवाल यांनी सांगितले की, राजधानीत बर्ड प्लूची नोंद अद्याप झालेली नाही. पक्षी मृतावस्थेत आढळल्यानंतर १०४ नमुने जालंधरमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथके तयार करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांना सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे. संजय, भलस्वा आणि हौज खास या तलावांसह पोल्ट्री मार्केट अशा ठिकाणी बाराईने लक्ष ठेवले जात आहे. संजय तलावात सतरा बदके मृमावस्थेत आढळली.
सुसाइड नोट लिहित तरुणीनं घेतला गळफास; आरोपीवर 'लव्ह जिहाद'चा आरोप
काही ठिकाणी अलीकडेच काही कावळे मृतावस्थेत आढळले. परिक्षण करण्यासाठी शीघ्र कृती दले स्थापण्यात आली आहेत.
Edited By - Prashant Patil