दि्ल्ली: तीन तुकडे करून मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये

वृत्तसंस्था
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

विपिन हा मुळचा उत्तराखंडमधील रहिवाशी आहे. तो दक्षिण दिल्लीत राहत होता. विपिनच्या हत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील महरौली भागात एका बारटेंडरची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेदुल्लाजॉब या रेस्टॉरंटमध्ये विपिनचंद्र जोशी या 30 वर्षीय युवकाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची तीन तुकडे करत फ्रीजमध्ये ठेवले होते. विपिनचंद्र रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर म्हणून काम करत होता. विपिनच्या भावाने तो 10 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याने महरौली पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविली होती.

विपिन हा मुळचा उत्तराखंडमधील रहिवाशी आहे. तो दक्षिण दिल्लीत राहत होता. विपिनच्या हत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Delhi bartender hacked to death, chopped body found in fridge