

Delhi Blast Update: i20 Car Had Links to Haryana, J&K, and Delhi
Esakal
दिल्लीत रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झालाय. तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. i20 कारमध्ये हा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटकांनी भरलेली कार धीम्या गतीनं सिग्नलजवळ आली आणि तिथं अनेक गाड्या थांबल्या असताना स्फोट झाला. आता या प्रकरणी कारच्या जुन्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मोहम्मद सलमान असं त्याचं नाव आहे. दीड वर्षांपूर्वी त्यानं कार विकली होती असं पोलिसांना सांगितलंय. ओखला इथं राहणाऱ्या देवेंद्रला ही गाडी विकण्यात आली.