

Delhi Blast Tragedy 9 Dead 20 Injured Identities of Victims Revealed
Esakal
राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींनी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे